भिवंडी(प्रतिनिधी) :- भिवंडी शहरातील रस्त्यांमुळे आधीच वाहनचालक मेटाकुटीस आलेला असताना शहरातील बेशिस्त रिक्षाचालक संपुर्ण शहरभर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत आपल्या रिक्षा दामटत असतात त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत असतानाच शहरातील बस स्थानकात येण्याजाण्यासाठी रस्त्यावर रिक्षा चालक प्रवाशांसाठी विळखा घालून बसत असल्याने बस चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.