पत्नीला व्हाटसअॅपवर तिहेरी तलाक देणा- या पतीला भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी ७ महिन्यानंतर अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी पती तलाक दिल्यानंतर दुबईत पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट नंबर प्राप्त करून त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस बजावल्याची कुणकुण लागल्याने तो भारतात परत येताना करतील या भीतीने तो मुंबईत न मुंबई विमानतळ पोलिस अटक उतरता अमृतसर विमानतळावर उतरला असता त्याला अमृतसर पोलिसांनी ताब्यात घेऊन भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. नदीम यासीन शेख (रा. कारिवली रोड) असे पोलिसांनी तिहेरी तलाक प्रकरणी अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव असून ते टेक्निकल अभियंता आहे. त्याचा विवाह मुस्लूि पध्दतीने १८ मे २०१४ रोजी निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून पिडीतेच्या आई-वडिलांनी जावई नदीम यास १० हजार ५१ रूपये रोख व संसारोपयोगी वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतर पीडीत पत्नीला पती व तिच्या सासरच्या मंडळींनी तू पसंद नसल्याचे कारण देत तिला शिवीगाळ करून मारझोड नेहमीच शिवीतहत. तर आरबी बदामीहा समय तिच्या चारित्र्यावर संशयही घेत असे
व्हाटसअॅपवर तिहेरी तलाक देणा-या पतीला अटक