ठाणे (प्रतिनिधी):- ठाणे महानगरपालिकेकडून २६० दिव्यां गांना स्टॉल बांधून देण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या उभारणीचे कंत्राट नाशिक येथील एका ठेकेदारा ला देण्यात आले आहे. एका स्टॉल च्या उभारणीसाठी ठामपा सुमारे १ लाख ६२ हजार रूपये अदा कर णार आहे. त्यामळे ठामपाचे समारे १ कोटी ६१ हजारांचे नुकसान होणार आहे. तर दुसरीकडे एक शटर असलेला स्टॉल बनवण्यासाठी साधारणपणे ६० हजार रूपयांचा खर्च येतो उर्वरित ४० हजार रूपये दिव्यांगांना अनुदान स्वरूपात दिल्या स त्यातून दिव्यांग आपला व्यवसाय ही सुरू करू शकतो, असा दावा विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी मंचचे यसफ फारूख खान यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेल्या निवेदनातून उघडकीस आणली आहे. खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार सध्या ठाणे महानगरपालिकेकडून २६० दिव्यांगाना स्टॉलचे वाटप करण्यात येत आहे. येत्या सहा फेब्रुवारीपासून हे स्टॉल देण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
विश्व दिव्याग अत्याचार विरोधी मंचाची मुख्यमंत्र्यांकडे कैफियत