सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून एल अॅण्ड टी कंपनीच्या डब्ल्युडीएफसीसी ईएमपी १६ युनिटच्या वतीने भिवं डीतील दुर्गम बंगलापाडा या आदि वासी बहुल वस्तीतील जिल्हा परि षदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे दिले. यावेळी एल अॅण्ड टी च्या कर्मचा-यांनी हमारी सुरक्षा हमारी जिम्मेदारी या कार्य क्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या साधनांची व उपाययोजनांची माहिती दिली. त्याचबरोबर सुरक्षेविषयी प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा घेऊन सुरक्षेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली. तसेच विद्यार्थ्यांना आव श्यक असलेल्या सुरक्षेची साधने देखील शाळेला भेट दिली. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण देखील केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील कर ण्यात आले होते. यात सहकारी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप व खाऊचे वाटप देखील करण्यात आले. याप्रसंगीएल अॅण्ड टी कंपनीचे अधिकारी अनिलकुमार सिंगअमितकुमार गर, बळीराम तांबडे, प्रविण गायकर यांच्यासह शाळेचे विद्यार्थी शिक्षक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बंगलापाडा शाळेचे मुख्याध्यापक राजू वाघमारे यांनी केले.
आदिवासी पाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिले सुरक्षेचे धडे