भिवंडीत सह दुय्यम निबंधक कार्यालयात |२७ लाखाचा अपहार.तीन जणाना अटक

भिवंडी (प्रतिनिधी):- भिवंडीतील सह दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ३ मध्ये चलन भरल्याच्या बनावट पावत्यांद्वारे तब्बल २७ लाख ११ हजार ४०० रूपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून या अपहार प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता १० फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. | भिवंडीतील सह दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ३ मध्ये बांधकाम व्यावसायिकाचा एजेंट व कार्यालयात तात्पुरता स्वरूपात काम करणा-या संगणक चालकाने ११ लाख ७४ हजार ४०० रूपयांचा आपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक दिलीप आव्हाड यांनी अपहार प्रकरणी नारणोली पोलिस ठाण्यात श्रवणकुमार सहदेव गजम (वय ३३ रा. पदमानगर) व कार्यालयातील तात्पुरता संगणक ऑपरेटर नागेश शिवाजी वयातमवार (वय २८) या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. या गुन्हयाचा सखोल तपास करत असताना नारपोली पोलिसांनी सह दुय्यम निबंधक कार्यालयातील दत्त तपासले असता यामध्ये सुमारे १५ दस्तामध्ये अपहार केल्याचे निष्पन्न झाले असून सुमारे या अपहार प्रकरणात सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ३ मधील कर्मचारी देखील सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून फिर्याद नोंदवणारे वरिष्ठ लिपिक दिलीप आव्हाड यांचा देखील सहभाग असून त्यांच्यासह या कार्या लिपिक अरूण कंखर, महिला एल एस सांगळे, संगणक ऑपरेटर दिपक शिंदे यांच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचे कर्मचारी फरार झाले आहेत. तर श्रवणकुमार सहदेव गजम, नागेश क्यातमवार व दिपक शिंदे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता १० फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडी मिळाली आहे. अशी माहिती नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे.